Skip to content Skip to footer

शेतकरी आंदोलन : अनेक नेते भाजप सोडण्याच्या तयारीत

प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलेले पाहायला मिळाले होते. त्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाल्याचे आढळून आले होते. त्यात सिंघू सीमेवर सुमारे दोनशे जणांच्या जमावाने बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या मोठय़ा फौजफाटय़ातही शेतकऱ्यांवर दगडफेक आणि मारहाण केली. त्यांच्या तंबूंची मोडतोड केली. तसा व्हिडिओ ‘आजतक’ या हिंदी वृत्तवाहिनीने दाखविला होता.

या घटनेनंतर शेतकरी आंदोलनातील दोन प्रमुख संघटनांनी माघात घेत आंदोलनातून बाजूला होत असल्याचे जाहीर केले होते. तसेच उत्तर प्रदेश सरकारने दिल्लीच्या सिमांवरील शेतकरी आंदोलकांना हटवण्यास सुरुवात केली. दुसरीकडे सिंघू सीमेवरही पोलिसांनी कारवाई केल्याने तणाव निर्माण झाला. दरम्यान याच गोंधळादरम्यान भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता व शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शुक्रवारी रात्री एक खळबळजनक दावा केला आहे.

टिकैत यांनी शुक्रवारी ट्विटरवरुन अनेक भाजपा नेते शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला आहे. “मला आज अनेक भाजपा नेत्यांचे फोन आले. त्यांनी आम्ही सुद्धा राजीनामा देत आहोत असं मला सांगितलं आहे. पक्षात राहून अशाप्रकारे आम्ही शेतकऱ्यांचा अपमान पाहू शकत नाही. अजूनही आम्ही गप्प राहिलो तर येणारी पिढी आम्हाला कधीच माफ करणार नाही, असं हे नेते म्हणाले,” असं ट्विट टिकैत यांनी केले आहे.

Leave a comment

0.0/5