Skip to content Skip to footer

आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्तीनंतर शहा पिता-पुत्र होत आहेत सोशल मीडियावर ट्रोल

राजकारण असो की क्रिकेट सर्वत्र घराणेशाही मोठ्या प्रमाणात आपल्या दिसून येईल. अनेकजण आपल्या बळाचा आणि ओळखीचा फायदा घेऊन आपल्या मुलांना सेट करण्यास प्रथम प्राधान्य देतात. हे अनेकवेळा दिसून आले आहे. कोणताही संघर्ष न करता पदावर बसणे हा घराणेशाहीचा सर्वात मोठा फायदा समजला जातो. क्रिकेट प्रशासनामध्ये अनेकवेळा दिसून आले आहे.

याच पॉवरचा फायदा घेत जय शहा हे विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांचे सुपुत्र असून गेले काही वर्ष ते क्रिकेट प्रशासनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. २०१९ सालापासून ते बीसीसीआयच्या सचिव पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. मागील वर्षी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.

त्यात आता BCCI चे सचिव जय शाह यांनी शनिवारी आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांना नजमुल हसन पापोन यांच्या जागी नियुक्त करण्यात आले आहे. त्यानंतर ट्विटरवर अमित शहा व जय शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. घराणेशाही म्हणत अनेकांनी या नियुक्तीवर आक्षेप नोंदवला. त्याविरोधात ट्विटरवर मोहीम चालवली गेली.

Leave a comment

0.0/5