Skip to content Skip to footer

महाविकास आघाडीमध्ये मोठ्या घडामोडी, काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली

राज्यात शिवसेना पक्षाने भाजपबरोबर काडीमोड घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर हात मिळवणी करून आघाडी सरकार स्थापन केले होते. या सरकारमध्ये सम-समान खात्यांचे वाटप तिन्ही पक्षात करण्यात आले होते. मात्र काँग्रेसच्या वाट्याला कमी पदे आल्याची तक्रार पक्ष श्रेष्टींकडे काँग्रेस नेते अनेकदा करताना दिसून आले होते.

मात्र आता काँग्रेसच्या वाट्याला सुद्धा उमुख्यमंत्री पद येणार आहे. सध्या राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रिपद असताना, दुसरे उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला देण्याची तयारी सुरु आहे. त्यासाठी शिवसेना अनुकूल आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे जर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले तर त्यांच्या जागी शिवसेनेच्या नेत्याची वर्णी लागू शकते. त्याबदलत्यात काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद हवे आहे.

लॉकडाऊनंतर आता राज्यात राजकीय रंग जोर धरु लागला आहे. तोंडावर असलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे तुलनेने महत्त्वाची पदं आहेत. त्यामुळे आता काँग्रेसनेही उपमुख्यमंत्रिपदामध्ये रस दाखवल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a comment

0.0/5