Skip to content Skip to footer

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर अमेरिकेचे भाष्य

केंद्राने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या दोन महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन करत आहेत. त्यात प्रजासत्ताक दिनी लाल किल्याच्या भवती घडलेल्या प्रकारामुळे साऱ्या जगाचे लक्ष आंदोलकांनी आपल्याकडे खेचून घेतले होते. अनेक विदेशी कलाकारांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. त्यात आता अमेरीकेने सुद्धा आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे हे लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण आहे. वाद सोडवण्यासाठी चर्चेचा मार्ग आवश्यक असल्याचे सांगत भारतात खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीची पाठराखण अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. याप्रकारे अमेरिकेने कृषी कायद्याचे समर्थन केले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, भारतातील बाजारपेठेची कार्यकुशलता सुधारण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांचे अमेरिका स्वागत करते. लोकांना इंटरनेट वापरासह माहिती मिळवण्याचा अधिकार हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग असल्याचे आम्ही मानत असून यशस्वी लोकशाहीसाठी हे आवश्यक असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. कोणत्याही वादावर चर्चेतून मार्ग काढता येऊ शकतो असेही अमेरिकेने म्हटले.

Leave a comment

0.0/5