Skip to content Skip to footer

“चांगला विकास करा.” पंकजा मुंडेंनी दिल्या आपल्या भावाला खास शुभेच्छा.

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपा नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे आज एका कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी पंजाने मुंडेंनी धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा दिल्या होत्या. ‘ज्यांच्या हातात सत्ता मिळाली ते नक्कीच चांगला विकास करतील’ असं म्हणत पंकजा यांनी धनंजय यांना शुभेच्छा दिल्या. तर धनंजय यांनीही ‘माजी पालकमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या’ म्हणत पंकजांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

संत श्रेष्ठ वामनभाऊंच्या पुण्यतिथी निमित्त आष्टी तालुक्यातील गहिनीनाथ गडावर पहाटे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते महापूजा पार पडली. दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी याच व्यासपीठावर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर आलेले पाहायला मिळाले. यावेळी दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी पाहण्यास मिळाली.

ज्यांच्या हातात सत्ता मिळाली ते नक्कीच चांगला विकास करतील. यासाठी धनंजय मुंडेंना पंकजा यांनी शुभेच्छा दिल्या. पंकजा यांनी शुभेच्छा दिल्याने त्याला उत्तर म्हणून धनंजय मुंडे यांनी लगेच उत्तर दिले. माजी पालकमंत्री म्हणाल्या आता आमची जबाबदारी विकासाची आहे आणि त्यासाठी शुभेच्छा पण दिल्या. त्याना अनेक वर्षे आम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील असा विकास करू’ असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला होता.

Leave a comment

0.0/5