Skip to content Skip to footer

अखेर नाना पाटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर निवड, हंडोरे आणि शिंदे यांनाही मिळाली नवी जबाबदारी.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अशीच चर्चा रंगताना दिसत होती. मात्र आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. अखेर पक्ष नेतृत्वाने ही जबाबदारी नाना पटोले यांच्या खांदयावर सोपवली आहे. तसेच काँग्रेसच्या इतरही नेत्यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी देण्यात आलेली आहे.

तसेच प्रदेशाध्यक्षा सोबतच काँग्रेसच्या ६ कार्यकारी अध्यक्षपदांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. नाना पटोले यांनी गुरुवारीच विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत होती आज अखेर त्यांच्या नावावर शिकामोर्तब करण्यात आला आहे.

काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदावर शिवाजी मोघे, बसवराज पाटील, मोहम्मह आरिफ नसीम खान, कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मोहम्मद नसीम खान आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यावर प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून काँग्रेसने मुंबई काँग्रेसमधील नाराजी दूर केली आहे. त्याचसोबत काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षांचीही घोषणा दिल्लीतून करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी शिरीष चौधरी, रमेश बागवे, हुसेन दलवाई, मोहन जोशी, रणजीत कांबळे, कैलास गोंरट्याल. बी.एल नगराळे, शरद आहेर, एम.एम नाईक, माणिकराव जगताप यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेसप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्येही पक्ष संघटनेत कार्यकारी अध्यक्षपद नव्याने निर्माण करण्यात आले आहे.

Leave a comment

0.0/5