Skip to content Skip to footer

सचिन तेंडुलकरच्या पोस्टरला केरळ युवक काँग्रेसने काळे फासले

केंद्राने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्या विरोधात शेतकरी दिल्लीच्या वेशीवर दोन महिने आंदोलन करत आहे. त्यात ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण देशभरातून नाही तर जगभरातून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठिंबा दर्शवला होता. त्यात क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने केंद्राच्या बाजूने केलेल्या ट्विटमुळे सर्व सामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.

तसेच संभाजी ब्रिगेडनेही सचिनचा भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार काढून घेण्याची विनंती सरकारकडे केली होती तर आता केरळ युवक काँग्रेसतर्फे सचिन तेंडुलकर याच्या पोस्टरला काळे फासून त्यांच्या वक्त्यव्याचा निषेध केला आहे. एकीकडे शेतकरी आंदोलन करत असताना दुसरीकडे केंद्राच्या समर्थनात केलेल्या ट्विटमुळे अनेकांनी नाराजी बोलून दाखवली आहे.

“भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याच्या भूमिकेत राहू शकतात, पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना देशाबद्दल माहित आहे आणि देशवासीयांनी निर्णय घ्यायला हवा. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया” अशी प्रतिक्रिया सचिनने दिली होती.

Leave a comment

0.0/5