Skip to content Skip to footer

खास इस्रायलहुन आली मोसाद’ची टीम, सर्वात शक्तिशाली संघटना म्हणून जगभरात ख्याती

इज्रायली दूतावास बाहेर झालेल्या स्फोटाच्या तपासासाठी मोसाद पथकाने दिल्लीत राष्ट्रीय तपास यंत्रणेची भेट घेतली होती. तसेच या दोन्ही देशातील पथकाने सदर जागेची एकत्र पाहणी सुद्धा केली होती. आता पर्यंत झालेल्या तपासाची NIA ने मोसाद अधिकाऱ्यांना माहिती दिली होती.

नवी दिल्लीत २९ जानेवारीला इस्रायली दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट झाला होता. भारतात एनआयए या स्फोटाचा तपास करत आहे, तर इस्रायलच्या यंत्रणाही त्यांच्या बाजूने आरोपींचा शोध घेत आहेत. मोसाद ही इस्रालयची गुप्तहेर संघटना असून जगातील सर्वात धोकादायक गुप्तहेर संघटना अशी ओळख आहे.

प्राथमिक तपासातून या बॉम्बस्फोटामध्ये इराणचा हात असल्याचे संकेत मिळत आहेत. तपासात भारतीय यंत्रणांना मदत करण्यासाठी मोसादचे पथक खास भारतात आले आहे. वेगवेगळया सोशल मीडिया अकाऊंटवरुन टेक्निकल डाटा गोळा केला जात आहे. तपासामध्ये आम्ही पूर्ण सहकार्य करु, इस्रायलचे भारतातील राजदूत डॉ. रॉन मल्का यांनी स्फोटानंतर सांगितले होते.

Leave a comment

0.0/5