Skip to content Skip to footer

हस्तीया डूब जाती है ! गृहमंत्री शहांच्या टीकेला खासदार संजय राऊत यांचा टोला

‘आम्ही दुसऱ्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती अशी टीका रविवारी गृहमंत्री अमित शहा यांनी सिंधुदुर्ग येथे केली होती. आता या टीकेला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कवितेच्या माद्यमातून जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले आहे की, “घमंड ज्यादा हो तो, हस्तीयाँ डूब जाती है”, म्हणत त्यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेने भाजपाचा हात सोडून राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. त्यांनतर तब्बल दीड वर्षांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवर ७ फेब्रुवारी रोजी थेट वक्तव्य केले.

शिवसेनेने भाजपचा हात सोडून राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. त्यांनतर तब्बल दीड वर्षांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवर ७ फेब्रुवारी रोजी थेट वक्तव्य केले. सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना शाह यांनी ‘शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वांना तापी नदीत बुडवले आणि सत्तेवर जाऊन बसले. आम्ही तुमच्या मार्गाने चालत नाही. तुमच्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती,’ असे वक्तव्य केले होते.

तब्बल दीड वर्षांनी अमित शाह यांनी शिवसेनेवर थेट निशाणा साधल्यामुळे शाह यांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व आले होते. त्यनंतर राऊत यांनी शाह यांच्या वक्तव्याचा समाचार घेत “१९७५ साली काँग्रेस नेत्या रजनी पटेल तर १९९० मध्ये बहुधा मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल, असे भाकीत वर्तविले होते. २०१२ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीही याच गोष्टीचा पुनरुच्चार केला. मात्र, प्रत्येकवेळी शिवसेना अधिक जोमाने वाढली,” असे प्रतिउत्तर दिले आहे.

Leave a comment

0.0/5