Skip to content Skip to footer

एक आमदार असलेल्या पक्षाने केंद्र सरकार विरोधात आंदोलन करावे – विजय वडेट्टीवार

लॉकडाऊनमध्ये सामान्य नागरिकांना आलेल्या भरमसाठ वीजबिलावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. सरकारमधील वीज मंत्री आधी वीज बिल कमी करु असं म्हटले. मात्र, अदानी शरद पवार यांच्या घरी जाऊन भेटून आल्यावर सरकारने कोणतंही वीजबिल माफ करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे अशी टीका केली होती. आता या टीकेला मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

वडेट्टीवार म्हणाले की “पक्षाचा एक आमदार असलेल्या राज ठाकरेंनी केंद्र सरकारच्या विरोधातही आंदोलन करावे. राज ठाकरे यांनी विज बिल बाबत आरोप-प्रत्यारोप आणि टीका करत असतानाच, त्यांनी विरोधाची भूमिका बजावत असताना सर्वसामान्यांना जो त्रास आज पेट्रोल-डिझेल, खाण्याचे तेल आणि गॅस वाढीमुळे झालेले आहेत त्याचाही विचार करावी. त्यांनी केंद्राच्या विरोधातही आपली भूमिका मांडावी”, अशी टीका मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

“सरकार इतकं निर्दयीपणे कसं वागू शकतं कळत नाहीये. मुलांच्या परीक्षांचा विचार नाही करायचा, कशाचाच विचार नाही करायचा. वीज बिल माफ होण्यासाठी वीज कंपन्यांबरोबर चर्चा कराव्या लागतील. पण या चर्चा थांबल्या आहेत. काही तरी लेणदेण झाल्याशिवाय या चर्चा थांबणार नाहीत. सरकार सर्व वीज कंपन्यांना पाठिशी घालण्याचं काम करत आहे असा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर लगावला होता.

Leave a comment

0.0/5