Skip to content Skip to footer

अभिनेता राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अभिनेता राजीव कपूर यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते ५८ वर्षाचे होते या संदर्भातील माहिती करीना कपूर हिचे वडील रणधीर कपूर यांनी दिलेली आहे. त्यामुळे कपूर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

त्यांना चेंबूर येथील इंलॅक्स इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रणधीर कपूर यांनी भावाला तातडीने जवळच्या इस्पितळात भरती केलं, पण उपचारांपूर्वीच राजीव कपूर यांचं निधन झाले होते. रणधीर यांनी राजीव यांच निधन झाल्याचे सांगितले.

भावाच्या निधनाबद्दल रणधीर म्हणाले की, ‘आज मी माझ्या छोट्या भावाला राजीवला गमावलं. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. पण त्याचे प्राण वाचवू शकले नाही. पुढील सर्व कामांसाठी आता मी इस्पितळातच आहे.’ तसेच नितु कपूर यांनी सुद्धा सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची माहिती दिलेली आहे.

Leave a comment

0.0/5