Skip to content Skip to footer

कल्याण : खोणी ग्रामपंचायतीत शिवसेनेचा झेंडा फडकला

खोणी ग्रामपंचायतमध्ये अखेर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. या ग्रामपंचायतमध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण पक्षामध्ये सरपंच पदासाठी चुरस होती. शिवसेनेच्या वंदना ठोंबरे आणि मनसेच्या जयश्री ठोंबरे यांच्यात सरपंच पदासाठी चुरस रंगली होती.

सरपंच पदासाठी शिवसेनेने आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. अखेर आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या वंदना ठोंबरे विजयी झाल्या. वंदना ठोंबरे यांची सरपंच पदी तर उपसरपंच पदी योगेश ठाकरे यांची निवड झाली. काल कोरम पूर्ण नसल्याने सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक स्थगित झाली होती.

सरपंच पदासाठी शिवसेना आणि मनसेमध्ये चुरस होती. भाजपचे निवडून आलेले दोन सदस्य कोणाला मतदान करतात यावर सरपंच पदाची निवडणूक अवलंबून होती. मात्र निवडणुकीच्या वेळी ११ पैकी फक्त ९ सदस्य उपस्थित राहिले यात पाच सदस्य शिवसेना, तीन सदस्य मनसे आणि एक राष्ट्रवादीचा सदस्य उपस्थित होता.

राष्ट्रवादीच्या सदस्याने तटस्थ भूमिका घेतली. तर दोन सदस्य उपस्थित राहिल्याने ९ पैकी ५ मत शिवसेनेच्या बाजूने पडल्याने शिवसेनेच्या वंदना ठोंबरे हे सरपंच पदी निवडून आल्या. उपसरपंच पदासाठी फक्त एकच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने योगेश ठाकरे उपसरपंच पदी निवडून आले. यावेळी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. येणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेना जिंकणार असा दावा कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केला आहे.

Leave a comment

0.0/5