Skip to content Skip to footer

इंग्रज, मुघलांनी अत्याचार केले नाही ते अत्याचार मोदी सरकार शेतकऱ्यांवर करत आहे – नाना पाटोले

नवी दिल्लीच्या सीमेवर गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. यावर बोलताना नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मोदींनी काहीही बोललं तरी तो कायदा होतो पण दुसऱ्याने काही बोललं तर तो राष्ट्रद्रोह होतो. इंग्रज आणि मुघलांनी जेवढे अत्याचार केले नाहीत तेवढे अत्याचार आताचे मोदी सरकार शेतकऱ्यांवर करत आहेत असा घणाघाती आरोप पाटोले यांनी केंद्र सरकारवर लगावला होता.

पुढे बोलताना ते म्हणाले की, दिल्लीत शेतकऱ्यांचं अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. खरंतर केंद्र शासनाने आतापर्यंत त्यांचं म्हणणं ऐकून तोडगा काढायला हवा होता. परंतु तोडगा काढण्याऐवजी देशाचे पंतप्रधान शेतकऱ्यांना हिणवत आहेत. हे देशाच्या दृष्टीने नक्कीच भूषणावह बाब नाही असे त्यांनी बोलून दाखिवले.

प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर नाना पटोले यांनी पहिल्यांदाच सोनिया गांधी यांची भेट घेतली. तसेच नाना पटोले यांनी राहुल गांधींची भेट घेऊन राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. महाराष्ट्रात काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत कसं करता येईल, येणाऱ्या काळात कोणते धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील, यासंबंधीची चर्चा झाल्याची माहिती पटोले यांनी दिली.

Leave a comment

0.0/5