Skip to content Skip to footer

नितेश राणे यांच्या त्रासाला कंटाळून नगरसेवकांचा प्रवेश, सेनेची टीका

वैभववाडी नगरपंचायतमधील ७ राणे समर्थक नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होत आहे. हे सर्व नेते भाजप आमदार नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असा टोला विद्यमान शिवसेना नेते आणि पूर्वीचे कट्टर राणे समर्थक मानले जाणारे सतीश सावंत यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना सेवनात म्हणाले की, वैभववाडी नगरपंचायतमधील ७ राणे समर्थक नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होत आहे. हे सर्व नेते भाजप आमदार नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करत आहेत. प्रवेश करत असलेले सर्व ७ माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आणि नगरसेवक आहेत. या सर्वांचा पक्षप्रवेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे असे त्यांनी पत्रकात माध्यमांशी बोलताना बोलून दाखविले आहे.

अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर भाजपाचे ७ कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. नारायण राणे यांना हा फार मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे शिवसेना कोकणात अधिक मजबूत होणार आहे.

Leave a comment

0.0/5