मराठा, ओबीसी, धनगर समाज सर्वांना सांगतो, हे सरकार तुमचा आहे – उद्धव ठाकरे

मराठा, ओबीसी, धनगर समाज सर्वांना सांगतो, आम्ही तुमचे आहोत. हे सरकार तुमचं आहे. कोणत्याही समाजाला न्याय दिल्याशिवाय शांत राहणार नाही, हे मुख्यमंत्री म्हणून माझं तुम्हाला वचन आहे. सगळ्या समाजाला मी न्याय देईन. न्याय देताना कुणाचं काहीही काढून घेणार नाही”, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिले.

मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात रविवारी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य केले होते.

एक गोष्ट नक्की चांगली आहे, प्रत्येक समाज म्हणतोय, त्यांना आरक्षण द्या, हरकत नाही. पण आमचं तसंच राहू द्या. कुणाचंही आरक्षण कमी होणार नाही. आदिवासी, धनगर आणि ओबीसी आरक्षण आहे तसंच राहील. मराठा समाजाला आरक्षण देऊ”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here