Skip to content Skip to footer

नारायण राणे आणि निलेश राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गिफ्ट देण्याची कुवत आजतरी राहिलेली नाही – विनायक राऊत

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही सुपुत्राचा खरपूस समाचार घेतला आहे. नारायण राणे यांची थोडीतरी लाज राखावी म्हणून आम्ही भाजपाच्या सात नगरसेवकांचा पक्षप्रवेश दोन दिवस पुढे ढकलला. अन्यथा अमित शाह सिंधुदुर्गात आले त्याचदिवशी आम्ही भाजपला धक्का देऊ शकलो असतो, अशा शब्दांत खासदार विनायक राऊत यांनी राणे कुटुंबीयांचा समाचार घेतला.

नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांनी केलेल्या टीकेनंतर विनायक राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वैभववाडीचे नगरसेवक नितेश राणे यांच्या हटवादीपणाला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे सांगितले. यानंतर भाजपचे जिल्ह्यातील आणखी पदाधिकारी शिवसेनेत येतील, असा दावाही विनायक राऊत यांनी केला.

निलेश राणे यांच्या बकवासगिरीला कोकणातील जनतेने एकदा नव्हे तर दोनदा धडा शिकवला आहे. मारामारी, शिवीगाळ, अरेरावी आणि हाणामारीची भाषा निलेश राणे यांनाच शोभते. ती भाषा इतरांना शोभत नाही. कोकणवासीय सुज्ञ आहेत. ते निलेश राणे यांना पुन्हा एकदा धडा शिकवतील, असे राऊत यांनी म्हटले.

Leave a comment

0.0/5