Skip to content Skip to footer

राम मंदिर उभारणीसाठी ट्रस्टच्या खात्यात जमा झाला १००० कोटींचा निधी.

अयोध्या येथील भव्य राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची निर्मिती करण्यात आली होती. या ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर उभारणीसाठी निधी उभारला जात होता. सध्या राबवण्यात आलेल्या मोहिमेच्या माध्यमातून मागच्या काही दिवसात सुमारे तब्बल १००० (एक हजार) कोटी रुपयाचा निधी जमा झालेला आहे अशी माहिती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त मठाधिपती श्री विश्वप्रसन्न तीर्थ महाराज यांनी दिली.

मंदिराच्या उभारणीसाठी केंद्राने श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना काही महिन्यांपूर्वी केली होती. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून निधी जमा करण्याचे काम ट्रस्टतर्फे संपूर्ण देशभरात चालत आहे. १५ जानेवारीपासून या ट्रस्टने देशभरात देणगी मोहिमेला प्रारंभ केला. याद्वारे आत्तापर्यंतच केवळ दीड महिन्याच्या कालावधीत ट्रस्टच्या खात्यात १००० कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे.

विश्वस्थ म्हणाले की, “दक्षिण भारतातील तसेच संपूर्ण देशभरातील राम भक्तांनी या मोहिमेला दिलेल्या प्रतिसादामुळे मी खूपच आनंदी आहे. निधी गोळा करायच्या कामासाठी मी मोठा प्रवास केला आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांनी या प्रकल्पासाठी मदत दिली आहे. निधीमध्ये वाढ होणं ही मंदिर निर्माणासाठी काम करणाऱ्या संपूर्ण हिंदू समाजासाठी महत्वाची बाब आहे. अयोध्येत मंदिर उभारायचं आणि त्यात प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची एवढाच ट्रस्टचा उद्देश नाही. तर पुढे जात रामराज्य म्हणजे आदर्श कल्याणकारी राज्य प्रस्थापित करण्याचं या प्रकल्पाचं अंतिम उद्दीष्ट आहे.” असे त्यांनी म्हणून दाखविले.

Leave a comment

0.0/5