Skip to content Skip to footer

“भांडारा दुर्घटनेतील दोषींपैकी कोणालाही पाठीशी घालणार नाही, कारवाई होणार.” – राजेश टोपे.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळं संपूर्ण भांडारा जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यात आता या घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलून दाखवले आहे.

भंडारा जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात शिशु केअर विभागाला लागलेल्या आगीत धुरामुळे गुदमरून १० बालकांचा मृत्यू झाला होता. त्यात ८ मुली तर २ मुलांचा समावेश होता. या घटनेनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. तसेच विरोधकांनी सुद्धा या मुद्यावरून राज्य सरकारला धारेवर धरले होते.

तसेच विरोधकांच्या कारवाई करण्याच्या मागणीनंतर सरकारने आपली भूमिका मांडून दोषींवर कडक करावाई केली जाईल, असे सांगितले आहे. या घटनेबाबत दोषींवर कारवाई करण्यासाठी FIR दाखल होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. या घटनेचा संपूर्ण रिपोर्ट आल्यानंतर याबाबत करावाई केली जाईल असे टोपे म्हणाले.

Leave a comment

0.0/5