Skip to content Skip to footer

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा कठोर नियम लागू करणार.” – किशोरी पेडणेकर.

मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अधिक कडक नियम पुन्हा एकदा लागू होण्याचे संकेत मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी दिले आहेत. काल मुंबईत पत्रकार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले होते.

मुंबईत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सर्व सामान्य प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा शासनाकडून देण्यात आली होती त्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रवासासाठी गर्दी वाढल्यामुळे कोरोना रुग्णाच्या संख्येत मागच्या काही दिवसात वाढ झाल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि मुंबई मनपा पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

जानेवारी महिन्यात दररोज ३०० ते ३५० रुग्ण आढळत होते. मात्र आता दररोज सरासरी ६०० ते ६५० रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे २२ फेब्रुवारीला आढावा घेऊन रुग्णसंख्येतील वाढ मोठी असल्यास लोकलबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले आहे.

Leave a comment

0.0/5