Skip to content Skip to footer

…तर अन्यथा आम्हालाही कर्नाटक राज्याचे प्रवासी रोखण्याचा विचार करावा लागेल – सतेज पाटील

संपूर्ण देशात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या सीमा इतर राज्यातील प्रवाशांसाठी बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच कोल्हापूर जिल्ह्याला लागून असलेल्या कर्नाटक राज्याने महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. यावर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी कर्नाटक सरकारच्या या भूमिकेवर संताप व्यक्त केला आहे.

यावर बोलताना पाटील म्हणाले की, कर्नाटक सरकारने प्रवाशांना न रोखता त्यांची कोरोना टेस्ट करून कर्नाटक राज्यात प्रवेश करायला परवानगी द्यावी. अन्यथा आम्हाला सुद्धा कर्नाटकचे प्रवाशी महाराष्ट्रात घेताना विचार करावा लागले अशी रोखठोक भूमिका घेतलेली आहे.

कोरोना संसर्ग वाढत असला तरी, महाराष्ट्रतील नागरिकांची कोरोना टेस्ट करुन त्यांना कर्नाटकमध्ये प्रवेश द्यावा. कर्नाटक सरकार आडमुठी भूमिका घेत असेल तर आम्हाला देखील कर्नाटकचे प्रवाशी महाराष्ट्रात घेताना विचार करावा लागेल असं त्यांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5