Skip to content Skip to footer

भारताला आवश्यक तितका लस पुरवठा झाला की मग जगाला आम्ही लस देऊ – पुनावाला

सध्या संपूर्ण जगभराचे लक्ष पुणे येथील पुनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या कोविशील्ड लसीकडे लागले आहे. त्यात अनेक देशांच्या लसीसंदर्भात मागण्या सुद्धा वाढलेल्या आहे. त्यात संपूर्ण जगभरातील देशांना कोविशील्ड लसीचा पुरवठा केला जात आहे. त्यातच आता अदार पुनावाला यांनी ट्विट केले आहे.

अदार पूनावाला म्हणाले, “जे देश आणि सरकार कोविशिल्डची प्रतीक्षा करत आहे, त्या सर्वांनी संयम राखावा अशी मी विनंती करतो. भारतात लशीची मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि तीच आमची प्राथमिकता आहे. भारताला आवश्यक तितका लस पुरवठा झाला की मग जगाला आम्ही लस देऊ. आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत” असं ट्विट त्यांनी केले आहे.

सीरम इन्स्टि्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनेका या दोन कंपनीच्या मदतीने तयार केलेली ही लस आहे. ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनंही या लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली होती.

Leave a comment

0.0/5