Skip to content Skip to footer

सर्वांना समान न्याय, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे – विनायक राऊत

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अडचणीत सापडलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीचे सर्व कुटुंबियांसोबत दर्शन घेतले होते. तसेच यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. मात्र त्यांच्या समर्थकांनी केलेल्या गर्दीमुळे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.

त्यातच आता या प्रकरणावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाष्य केले आहे. संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे गर्दी जमवून केलेले शक्तीप्रदर्शन अयोग्य होते. याप्रकरणात चौकशी पूर्ण झाल्यावर दोषींवर नक्की कारवाई होईल, असे वक्तव्य शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केले आहे. तसेच सर्वांना समान न्याय, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. असे सुद्धा राऊत यांनी बोलून दाखविले होते.

खासदार विनायक राऊत टीव्ही ९ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी राजकीय दबावाला बळी पडून कारवाई करणे योग्य ठरणार नाही. पोहारादेवीतील गर्दीमुळे मुख्यमंत्री संजय राठोड यांच्यावर नाराज आहेत का, हे मला माहिती नाही. या प्रकरणावरुन महाविकासआघाडीत कोणतीही खदखद नाही. मात्र जे चुकले आहेत त्यांना मुख्यमंत्री क्षमा करणार नाही असे राऊत यांनी बोलून दाखविले होते.

Leave a comment

0.0/5