Skip to content Skip to footer

..म्हणूनच स्टेडियमचे नरेंद्र मोदी असे नामकरण करण्यात आले, प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका

अहमदाबादमधील मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने असलेल्या स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले आहे. या निर्णयावरून काँग्रेस बरोबर सर्व विरोधकांनी भारतीय जनता पक्षावर आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यातच वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

“मोदींना मृत्यूनंतर आपल्याला कोणी लक्षात ठेवणार की नाही याबद्दलची खात्री नसल्यानेच स्टेडिअमला आपलं नाव दिले आहे” अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर केलेली आहे. तसेच या नामकरणाला विरोध दर्शवला होता.

भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मतदार संघात हे भव्य स्टेडियम उभारण्यात आले आहे. या स्टेडियमचे उदघाटन देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र स्टेडियमच्या नव्या रुपाचे उद्घाटन होत असताना त्याचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले आहे. यावरुनच प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.

Leave a comment

0.0/5