Skip to content Skip to footer

सिलेंडरच्या किमतीत पुन्हा वाढ, सामान्य नागरिकांचा खिसा होणार आणखी खाली

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत असताना दुसरीकडे घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किमतीत वाढ झालेली आहे. या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे बजेट पूर्णपणे विस्कळीत होणार आहे. तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किंमतीत २५ रूपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे सबसिडी नसणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत ७९४ रूपये इतकी झाली आहे.

फेब्रुवारी महिन्यात तीन वेळा घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली होती. यावरून पुढील महिन्यात देखील या किंमती अजून वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. डिसेंबरपासून तब्बल २०० रूपयांनी सिलेंडर महागला आहे. तीन महिन्यात ५९४ रूपयांवरून गॅसची किंमत ७९४ रूपये इतकी झाली आहे.

साधारण पहिल्या आठवड्यात घरगुती गॅसच्या किमतीत वाढ होत असते. तसेच फेब्रुवारी महिन्यात गॅसच्या किंमतीत १९० रूपयांची वाढ झाली आहे. यानंतर दिल्लीमध्ये या १९ किलोग्रॅमच्या सिलेंडरची किंमत १५३३ रूपये प्रति सिलिंडर तर मुंबईत १४८२ रूपये आहे.

Leave a comment

0.0/5