Skip to content Skip to footer

PAN-Aadhaar Linking: आज आहे शेवटची मुदत, आयकर विभागाची वेबसाइट हँग, एसएमएसद्वारे करा लिंक

महाराष्ट्र बुलेटिन : आपण आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले आहे का? आयकर विभागाने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२१ निश्चित केली आहे. दरम्यान अनेकांनी आयकर विभागाच्या वेबसाइटद्वारे पॅन कार्डला आधारशी लिंक करण्यात अडचण येत असल्याची तक्रार केली आहे. अशा परिस्थितीत आपण एसएमएस पाठवून देखील पॅनकार्ड आधारशी लिंक करू शकता.

एसएमएस पाठवून पॅनला आधारशी कसे लिंक करावे?

यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर टाइप करावे लागेल- UIDPAN, त्यानंतर १२-अंकी आधार क्रमांक आणि नंतर १०-अंकी पॅन नंबर लिहा. आता स्टेप १ मध्ये नमूद केलेला मेसेज ५६७६७८ किंवा ५६१६१ वर पाठवा. उदाहरणार्थ, UIDPAN 111122223333 AAAPA9999Q

आयकर वेबसाइटद्वारे पॅन कार्डला आधारशी लिंक करण्याची पद्धत

– प्रथम आयकर वेबसाइटवर जा.
– आधार कार्डमध्ये दिलेले नाव, पॅन नंबर आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा.
– आधार कार्डमध्ये केवळ जन्माच्या वर्षाचा उल्लेख असल्यास चौकोनावर टिक करा.
– आता कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
– आता Link Aadhaar या बटणावर क्लिक करा.
– आपला पॅन आधारशी लिंक होईल.

एनएसडीएल (NSDL) किंवा यूटीआयआयटीएसएल (UTIITSL) च्या सर्व्हिस सेंटर

पॅन सर्व्हिस प्रोव्हायडर, एनएसडीएल किंवा यूटीआयआयटीएसएलच्या सर्व्हिस सेंटरवर जाऊन देखील पॅन कार्ड आणि आधार कार्डला लिंक केले जाऊ शकते. त्यासाठी Annexure-I फॉर्म भरावा लागेल आणि त्यासाठी पॅनकार्ड व आधार कार्डची प्रत आवश्यक असेल. या प्रक्रियेमध्ये एक निश्चित शुल्क द्यावे लागेल.

Leave a comment

0.0/5