Skip to content Skip to footer

‘आदित्य जनसेवा सप्ताह’ निमित्त दादरमध्ये राबविण्यात आली लसीकरण मोहीम…

 

महाराष्ट्र बुलेटिन : शिवसेना नेते- युवासेनाप्रमुख, महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन तथा राजशिष्टाचार मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांची तरुणाईत असलेली क्रेझ सर्वांनाच परिचित आहे. त्यांचा वाढदिवस दरवर्षी शिवसेना- युवासेना कार्यकर्तेच नाही तर अनेक सामाजिक संघटना आणि महाविद्यालयीन तरुण तरुणींच्या समूहांकडून विविध कल्पक उपक्रमांद्वारे साजरा केला जातो.

विशेष म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनरबाजी न करता तिथे खर्ची होणारा निधी समाजोपयोगी कार्यात गुंतवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेशवजा आदेश आदित्य ठाकरे नेहमीच कार्यकर्त्यांना देऊन त्यांचा उत्साह, उर्जा सत्कारणी लावत असतात.

प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील हीच परंपरा पुढे सुरू असून, किंबहुना ती अजून मोठ्या प्रमाणात पुढे नेऊन युवासेनेने ‘आदित्य जनसेवा सप्ताह’चे आयोजन केले आहे. या संकल्पनेंतर्गत आगामी पूर्ण आठवडाभर युवासेना महाराष्ट्रभर समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे.

युवासेना सहसचिव श्री. मयूर कांबळे यांनी या ‘आदित्य जनसेवा सप्ताह’चा शुभारंभ आज दादर येथे केला आहे. समाजाला आजमितीला सर्वाधिक गरजेच्या अशा लसीकरण मोहिमेपासून त्यांनी या सप्ताहाची सुरुवात केली आहे. त्यांनी वाढदिवसानिमित्त लसीकरण मोहीम राबवून समाजाला वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला असून त्यामुळे त्यांचे सर्व लाभार्थ्यांकडून या मोहिमेबद्दल आणि सुनियोजित व्यवस्थेबद्दल कौतुक होत आहे.

मयूर कांबळे यांनी १८ वर्षापुढील वयोगटाच्या नागरिकांसाठी लसीकरण शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचा सुमारे १३० नागरिकांनी लाभ घेतला. येत्या आठवड्यात अशा प्रकारच्या अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती देखील मयूर कांबळे यांनी दिली.

Leave a comment

0.0/5