महाराष्ट्र बुलेटिन : शंभूराजे प्रतिष्ठाणचे सर्वेसर्वा संदिपशेठ जगदाळे पाटील व नागरगांव येथील युवा कार्यकर्ते सोमनाथ साठे यांनी शिवसेना पक्षात आज प्रवेश केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद बरोबर घेऊन शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे तसेच शिवसेना उपनेते शिवाजीदादा आढळराव पाटील आणि जिल्हाप्रमुख माऊली आबा कटके यांच्या मार्गदर्शनानुसार शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शिवसेना पक्षात प्रवेश होत आहेत.
जगदाळे यांनी मोठ्या प्रमाणात समाजकारण करून लोकांच्या मनात आपली जागा निर्माण केली असून शंभूराजे प्रतिष्ठाणच्या माध्यमातून त्यांनी मांडवगण फराटा मध्ये तसेच आजूबाजूच्या गावांमधे अनेक वेळा तरुणांना बरोबर घेऊन रक्तदान शिबीरे आयोजित केली आहेत. या माध्यमातून त्यांनी कोरोना काळात भरपूर जणांना रक्तबॅग, प्लेटलेट, प्लाझ्मा मिळवून देण्याचे अतिशय महत्वाचे काम केले आहे. परंतु समाजकारण करत असताना आपण कुठेतरी कमी पडतो आणि मग ती कमी भरून काढण्यासाठी राजकीय वरदहस्त आवश्यक असतो, या भावनेने त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे समोर आले आहे.
त्यांनी आज शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख पै. माऊली आबा कटके, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य रामकृष्ण सातव पाटील, शिरूर तालुका प्रमुख सुधीर फराटे इनामदार, हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, खेड तालुकाप्रमुख रामदास आबा धनवटे, शिरूर विधानसभा संघटक, वडगाव रासाई ग्रा.पं. सदस्य विरेंद्र शेलार आदी मान्यवरांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला.
याप्रसंगी केशव फराटे, गणेशकाका फराटे, मनोहर फराटे, योगेश फराटे, पै. दत्ताभैय्या गायकवाड, पै. आकाश सुर्यवंशी, पै. ऋषी सकुंडे हे उपस्थित होते. मांडवगण फराटा व परिसरातील बराचसा तरुण वर्ग संदिपशेठ जगदाळे पाटील यांच्या संपर्कात असून त्यांचे समाजाप्रती असणारे प्रेम नक्कीच त्यांना राजकीय क्षेत्रात पुढे घेऊन जाईल असे मत माऊली आबा कटके यांनी व्यक्त केले व त्यांना भावी राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.