Skip to content Skip to footer

डॉ. राहुल आहेर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला ‘संत पूजन सोहळा’

महाराष्ट्र बुलेटिन : आज आषाढी एकादशीनिमित्त तसेच कोरोना महामारीमुळे २ वर्षांपासून वारी होत नसल्याने चांदवड-देवळा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या संकल्पनेतून “संत पूजन सोहळा” आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला चांदवड व देवळा तालुक्यातील वारकरी व किर्तनकार यांचा पूजन व सत्कार सोहळा पांडुरंगाची मूर्ती, तुळशीमाळ, बुक्का, गंधगोळी, वारकरी उपरणे देऊन डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी त्यांनी संतांनी जतन केलेली परंपरा अविरत सुरु ठेवल्यामुळे कीर्तनकार व वारकरी मंडळींचे मनस्वी आभार देखील व्यक्त केले. विशेष म्हणजे गेल्या पाच दिवसांपासून ऑनलाइन प्रवचनाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता. यामुळे जीवन जगण्यासाठी तारक असणारे संतांचे विचार लोकांच्या कानावर पडले. विशेष म्हणजे या ऑनलाइन प्रवचनाला चांदवड देवळा तालुक्यातील लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील दर्शविला आहे.

दरम्यान “संत पूजन सोहळा” कार्यक्रमाला देवरगाव येथील ह.भ.प. सुजित महाराज, ह.भ.प. तुकाराम महाराज निकम, ह.भ.प. माधव महाराज शिंदे, ह.भ.प. संजयनाना धोंडगे, ह.भ.प. मधुकर महाराज जाधव, ह.भ.प. शिवाजी महाराज आहेर, ह.भ.प. नामदेव महाराज ठाकूर, ह.भ.प. निवृत्ती बाबा काळे यांच्यासह दोन्ही तालुक्यातील बहुसंख्य कीर्तनकार उपस्थित होते. यावेळी ह.भ.प. नवनाथ महाराज गांगुर्डे यांनी प्रास्ताविक केले तर ह.भ.प. सौरभ महाराज यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले.

Leave a comment

0.0/5