Skip to content Skip to footer

आमदार योगेश कदम यांच्या वतीने खेडमधील पूरग्रस्तांना विविध वस्तूंचे वाटप…

महाराष्ट्र बुलेटिन : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार व अती मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागांमध्ये पुरामुळे तर काही ठिकाणी दरड कोसळल्यामुळे व अति पावसाने पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान पावसाचा जास्त फटका हा कोकणाला बसला असून रत्नागिरीच्या खेड शहरामध्ये पुरामुळे लोकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान खेड शहरात पुरामुळे बिकट परिस्थिती ओढावली असून या परिस्थितीतून सावरण्यासाठी पूरग्रस्तांना आमदार योगेश कदम हे सर्वतोपरी मदत करत असून विविध आवश्यक वस्तूंचे वाटप ते करीत आहेत. काल त्यांच्यामार्फत खेड शहरातील बाजारपेठ, सोनार आळी, कुंभारवाडा, कुवारसाई, खांबतळे, पानगल्ली, गुजरआळी येथे जवळपास २४० किटचे वाटप करण्यात आले आहे.

त्याचबरोबर खेड शहरातील गाळ चिखल साफ करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांना देखील ७० किटचे वाटप करण्यात आले आहे. सदर किट मध्ये ब्लँकेट, शर्ट, ड्राय फ्रूट, मॅगी, बिस्कीट पॅकेट्स, डाळ, तांदूळ, गहू, तेल, साबण, कडधान्य, पिण्याच्या पाण्याच्या बॉटल, चटई, चादर, टॉवेल, साडी अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.

तसेच आमदार योगेश कदम यांच्या वतीने महिला आघाडीच्या माध्यमातून देखील पौत्रिक मोहल्ला येथे चटई, सॅनिटरी पॅड, चादर टॉवेल, मॅगी, बिस्कीट पॅकेट्सचे वाटप करण्यात आले आहे. दरम्यान ही परिस्थिती लवकरात लवकर कशी नियंत्रणात येईल या उद्देशाने पाऊले उचलली जात असून सर्वांनी धीर धरावा असे योगेश कदम यांनी पूरग्रस्तांना आश्वस्त केले आहे.

Leave a comment

0.0/5