Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माऊली आबा कटके राबवत आहेत स्वखर्चातून मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम

महाराष्ट्र बुलेटिन : राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शिवसेना जिल्हा प्रमुख माऊली आबा कटके यांनी स्वखर्चातून मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात येत असून अनेक समाजोपयोगी कामे करून लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत. दरम्यान माऊली कटके यांनी देखील स्वखर्चातून लसीकरण मोहीम सुरु करून समाजाला एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या मोहिमेमुळे लसीकरणापासून वंचित राहिलेल्या अनेक नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

सदर लसीकरण वाघोलीच्या बी.जे.एस कॉलेज येथे सुरु असून या मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि जास्तीत जास्त लोक लस घेण्यासाठी उपस्थित राहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान ज्यांनी अद्याप संपर्क कार्यालयात नोंदणी केली नसेल त्यांनी करून घ्यावी व लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन माऊली आबा कटके यांनी नागरिकांना केले आहे.

विशेष म्हणजे सर्वांना संपर्क साधून लसीकरणाची वेळ व तारीख सांगण्यात येत असून कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून लसीकरण मोहीम सुरळीतपणे सुरु आहे.

Leave a comment

0.0/5