Skip to content Skip to footer

आजपासून मिळणार मंदिरात प्रवेश… अशी असेल नियमावली

PUNE: राज्य शासनाच्या ‘ब्रेक द चेन सुधारीत मार्गदर्शक सुचने’नुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रात बंद असलेली धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे (प्रतिबंधित क्षेत्रातील वगळून) मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, थर्मल स्कॅनिंग व हात धुणे किंवा निर्जंतूकीकरण करणे या नियमांचे पालन करण्याच्या अटीवर आजपासून सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

आदेशानुसार ६५ वर्षे वयावरील नागरिक, को-मॉर्बिड लक्षणे असलेले व्यक्ती, गर्भवती महिला व १० वर्ष वयाखालील मुले यांनी घरीच थांबावे. धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणारे व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या ठिकाणी भेट देणारे नागरिक व काम करणाऱ्या कामगारांना कोविड- १९ ची लागण होऊ नये अथवा प्रसार होऊ नये याकरीता दक्षता घ्यावी. धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी गर्दी होऊ नये याकरीता दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी सहा फुट अंतर ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी.

प्रत्येक नागरिक, भेट देणारे व्यक्ती यांनी चेहऱ्यावर मास्कचा वापर केल्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये. साबणाने वारंवार हात धुवावेत (कमीत कमी ४०-६० सेकंद पर्यंत) अथवा हात निर्जंतुक करण्यासाठी अल्कोहोल मिश्रीत सॅनिटायझरचा वापर करण्यात यावा. (कमीत कमी २० सेकंद). श्वसनाबाबत शिष्टाचाराचे तंतोतंत पालन करण्यात यावे. खोकताना व शिंकताना तोंड व नाक झाकणे, शिंकताना टिश्यू पेपर , हातरुमाल, हाताच्या कोपऱ्याचा वापर करावा व टीश्यू पेपरची विल्हेवाट योग्यरित्या करावी.

Leave a comment

0.0/5