Skip to content Skip to footer

व्यापारयुद्धा चा तिढा सुटेना

वॉशिंग्टन – व्यापारयुद्धा वर तोडगा काढण्यासाठीच्या चर्चेला प्रारंभ झालेला असतानाच अमेरिकेने चीनकडून आयात केल्या जाणाऱ्या १६ अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर आणखी शुल्क आकारल्याची घोषणा आज केली. त्याला चीननेही जशास तसे उत्तर दिल्याने व्यापारयुद्धावरून निर्माण झालेल्या तणावात आणखी भर पडली आहे.

व्यापारयुद्धावर तोडगा काढण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये अमेरिका व चीनच्या शिष्टमंडळात खलबते सुरू आहेत. मात्र, त्याला अद्याप यश आले नसल्याचे आज स्पष्ट झाले. अमेरिकेने चीनकडून आयात होणाऱ्या सेमी कंडक्‍टर, रासायनिक, प्लॅस्टिक, इलेक्‍ट्रिक दुचाकी अशा १६ अब्ज डॉलरच्या २७९ उत्पादनांवर जादा शुल्क आकारणीचा निर्णय जाहीर केला. याला चीननेही त्याच भाषेत उत्तर दिले असून, चीनने अमेरिकेकडून आयात होणाऱ्या तितक्‍याच रकमेच्या उत्पादनांवरील आयात शुल्कात २५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ केली आहे.

चीन ‘डब्लूटीओ’त दाद मागणार
बीजिंग – अमेरिकेने नव्याने केलेल्या जादा शुल्क आकारणीमुळे जागतिक व्यापर संघटनेच्या (डब्लूटीओ) नियमांचे उल्लंघन झाले असून, याविरोधात डब्लूटीओकडे दाद मागणार असल्याचे चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने आज स्पष्ट केले. अमेरिकेने हा प्रकार थांबविला नाही, तर त्याला आगामी काळात चीनकडून त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असेही मंत्रालयाने नमूद केले.

Leave a comment

0.0/5