Skip to content Skip to footer

ई-कॉमर्स क्षेत्रावर ‘अॅमेझॉन’ चे वर्चस्व!

नवी दिल्ली – ई-कॉमर्स कंपन्यांची सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जय्यत तयारी सुरू असते. सेलमध्ये बड्या ब्रँड्सच्या वस्तूंवर अॅमेझॉन, फिल्पकार्टवर सारख्या कंपन्या ग्राहकांना मोठी सवलत देत असतात. पण आता अॅमेझॉनने फिल्पकार्टला मागे टाकत बाजी मारली आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील अव्वल क्रमांकाची ई-कॉमर्स कंपनी बनण्याचा मान अॅमेझॉनने पटकावला आहे.

३१ मार्च २०१८ ला संपलेल्या आर्थिक वर्षात अॅमेझॉनने तब्बल ५३ हजार कोटी रुपयांची (साडेसात अब्ज डॉलर) विक्री करण्याची कामगिरी करून दाखवली आहे. नुकत्याच ‘बार्कलेज’ने प्रकाशित केलेल्या अहवालातून याबाबतची माहिती समोर आली आहे. पाच वर्षांपूर्वीच देशांतर्गत बाजारपेठेत अॅमेझॉनने पाऊल ठेवले आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टमध्ये सातत्याने स्पर्धा पाहायला मिळते.

‘बार्कलेज’च्या अहवालानुसार अॅमेझॉनने फ्लिपकार्टला ‘ग्रॉस मर्कंटाइझ व्हॅल्यू्’ अर्थात ‘जीएमव्ही’मध्ये मागे टाकून देशातील सर्वांत मोठी कंपनी बनण्याचा मान पटकावला आहे. पण या अहवालात ‘फ्लिपकार्ट’च्या ‘जबाँग’ आणि ‘मिंत्रा’ या उपकंपन्यांचा विचार करण्यात आलेला नाही.

Leave a comment

0.0/5