Flipkart Big Diwali Sale : या दिवशी पुन्हा धमाका; ८० टक्क्यांपर्यंत मिळणार सूट

flipkart-big-diwali-sale-या-दिवशी-पुन्हा-धमाका-flipkart-big-diwali-sale-this-day-again-explosion

Flipkart Big Diwali Sale upcoming deals, offers :

Flipkart Big Diwali Sale upcoming deals, offers : बिग बिलियन डेज सेल संपल्यानंतर फ्लिपकार्टनं आता दिवाळी सेलची घोषणा केली आहे. फ्लिपकार्टच्या Big Diwali Sale ला २९ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. हा सेल सात दिवस म्हणजेच ४ नोव्हेंबरपर्यंत असेल.  फ्लिपकार्टने आपल्या आगामी सेलमध्ये मिळणाऱ्या ऑफर आणि डील्सबद्दल झलकही दाखवली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, हेडफोन, कॅमेऱ्यासह अनेक इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायंसेसवर मोठी सूट मिळण्याची शक्यता आहे. ग्राहकांकडे Axis Bank चं एटीएम किंवा क्रेडिट कार्ड असेल तर अतिरिक्त सूट मिळणार आहे. Axis Bank द्वारे खरेदी करणाऱ्याला १० टक्केंची सूट मिळणार आहेच. शिवाय ५ टक्केंचा कॅशबॅकही मिळणार आहे. यासोबतच No Cost EMI ची सुविधाही देण्यात आली आहे. या सेलदरम्यान मोठी सूट मिळण्याची शक्यता आहे.

Flipkart ने आपल्या संकेतस्थळावर Big Diwali Sale साठी मायक्रो वेबसाइट तयार केली आहे. इतर मोठ्या सेलप्रमाणे हा सेलही फ्लिपकार्टच्या ‘Plus’ ग्राहकांना एक दिवस आधीच खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्टने या सेलदरम्यान मिळणाऱ्या वस्तूंची किंमत जाहिर केली नाही. मात्र, संकेतस्थळावरील माहितीनुसार अनेक वस्तूंवर मोठी सूट असल्याचं दिसून येतेय. या सेलदरम्यान स्मार्टफोन्सवर मोठा डिस्काउंट मिळण्याची शक्यता आहे. Realme Narzo सीरीज, Samsung Galaxy स्मार्टफोन्स, Oppo स्मार्टफोन्स आणि Poco स्मार्टफोन्सवर मोठी सूट मिळणार आहे. याशिवाय मोबाइल प्रोटेक्शन प्लानला फक्त एक रुपयांत खरेदी करण्याची संधीही मिळणार आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि एक्सेसरीज कॅटेगरी वर ८० टक्केंपर्यंतची सूट देण्याचा दावा संकेतस्थळावर करण्यात आला आहे. बेस्ट सेलिंग लॅपटॉप्सवर ५० टक्केंपर्यंतची सूट मिळणार आहे. शिवाय, प्रीमियम टॅबलेटवर ४५ टक्केंपर्यंतची सूटही देण्यात येत आहे. हेडफोन आणि स्पीकर्स यांच्यावरही ८० टक्केंपर्यंतची सूट देण्यात येत आहे. TV आणि अप्लायंसेसवर ८० टक्केंची सूट मिळणार आहे. ३२ इंचाचा टिव्हीची सुरुवातीची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. याशिवाय फ्रीज, वॉशिंग मशीन, किचन अप्लायंसेसवरही मोठी सूट मिळणार आहे. इतकेच नाही तर किराना, फर्निचर, होम एण्ड किचनवरही मोठी सूट देण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here