सुशांत प्रकरणात बिहारी राज्यकर्ते आपली पोळी भाजतायंत, सर्व्हे रिपोर्ट आला समोर
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या मृत्यू संदर्भात अनेक दावे केले गेले. त्यात सुशांतची आत्महत्या नसून हत्या करण्यात आलेली आहे, असे आरोप लागवण्यात आले होते. त्यात केंद्राने दखल घेतल्याने सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. मात्र एम्सच्या डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात त्यांची हत्या नसून आत्महत्या आहे असा दावा करण्यात आला होता.
मात्र या प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले होते. यात एका सर्व्हेदरम्यान ६२ टक्के लोकांनी सुशांतच्या मृत्यू प्रकरणात राजकारण सुरू असल्याचे मत नोंदवले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये एक सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेदरम्यान या प्रकरणावर नागरिकांनी आपली मते नोंदवली. सी-वोटर सर्वेक्षणानुसार ६२.४ टक्के लोकांनी सुशांत सिंह राजपूतच्या नावावर राजकारण सुरू असल्याचे म्हटले आहे. तर, ३७.६ टक्के लोकांनी या गोष्टीचा दावा फेटाळला आहे.