Skip to content Skip to footer

Annabelle Creation द कॉन्जुरिंग मालिकेमधला सर्वोत्तम चित्रपट

Annabelle Creation हा जेम्स वॅन यांच्या द कॉन्जुरिंग या मालिकेमधला चौथा चित्रपट. या चित्रपटाची कथा सुद्धा (भुताने पछाडलेल्या बाहुलीची) पूर्वीच्या चित्रपटासारखीच. तरी देखील दिग्दर्शक डेविड सँड्सबर्ग यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनामुळे हा मालिकेमधला सर्वोत्तम चित्रपट ठरतो.

ही कथा आहे १९४० च्या आसपासची. सॅम्युएल म्युलिन्स या एक बाहुली बनवणाऱ्या कलाकाराची व त्याच्या कुटुंबाची. अचानक एके दिवशी त्याच्या छोट्या मुलीचा अपघाती मृत्यू होतो. ही घटना सॅम्युअल्स व त्याच्या बायकोच्या आयुष्याला कलाटणी देऊन जाते आणि ही जोडी पूर्णतः भेदरून जाते. ही घटना घडून गेल्या नंतर १२ वर्षांनी घराला खाऊन उठणारी शांतता घालवण्यासाठी ते दोघे विरंगुळा म्हणून ६ अनाथ मुलींना घरात राहायला बोलवतात आणि तिथून चालू होतो मग पाठशिवणीचा खेळ. त्या बाहुलीला कोणाच्या भुताने व का पछाडलेले आहे, मग शेवटी काय होत याच उत्तर चित्रपटाचा शेवट देतो.

वश्य वाचा – आकडा 100 कोटींच्या पार, ‘टॉयलेट…’ बॉक्स ऑफिसवर सुसाट

अर्धवट दरवाजामधून दिसणार भूत, संपूर्णतः निरव शांतता असताना अचानक कुठून तरी होणार मोठा आवाज, अचानक समोर येणार चेहरा असे भयपटाला शोभतील असे अनेक प्रसंग समोर येतात. सरकणारी खुर्ची, बेडशीट मध्ये गप्पा मारत असताना मुलींना होणारी भुताची चाहूल, पडघरामधील बुजगावण्याचा प्रसंग, विहिरीजवळचा प्रसंग अशा अनेक गोष्टी जमून आल्या आहेत. हे प्रसंग एवढे भयानक आहेत कि अक्षरशः ते आपल्याला डोळे मिटवायला, भीतीने किंचाळायला, खुर्ची मध्ये लपून बसायला भाग पाडतात.

एकंदरीत Annabelle Creation मध्ये नवीन असं काही नाही. तरी देखील चित्रपट पाहत असताना येणाऱ्या भीतीमय प्रसंगामुळे  ही गोष्ट बाजूला पडून हा चित्रपट आपल्याला खुर्चीला खिळवून ठेवतो.

हा भाग Annabelle चा पूर्वार्ध आहे. या दोन चित्रपटाची केलेली जोडणी वाखाणण्याजोगी आहे. Annabelle कोण आहे, कुठून आली, का आली या सगळ्या गोष्टींची उत्तर हा चित्रपट देतो. हे सर्व अनुभवण्यासाठी हा चित्रपट नक्की एकदा तरी चित्रपटगृह मध्ये पाहावा. हा चित्रपट भयपट प्रेमींसाठी एक मेजवानीच आहे .

 

IMDB Rating – 7.1/10

https://maharashtrabulletin.com/rajesh-shrungarpure-in-daddy-movie/

 

 

 

Leave a comment

0.0/5