मुंबई: दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट “ठाकरे” सिनेमाचे पुढचे भागही येणार आहेत. सध्या निर्मिती प्रक्रियेमध्ये असलेल्या या सिनेमाचं जवळपास 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकीच्या भूमिकेचंही चित्रीकरण पूर्ण झालं असल्याची माहिती सिनेमाचे निर्माता आणि खासदार संजय राऊत यांनी दिली.
‘माझा कट्टा’वर संजय राऊत यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली.
अलीकडच्या काळात येणाऱ्या जीवनपटांचं संजय राऊत यांनी समर्थन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांदी यांच्यावरही सिनेमे यायला हवेत. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट ठाकरे सिनेमाचं काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचा दुसरा भागही येणार आहे. शिवाय कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर सिनेमा बनवणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
https://maharashtrabulletin.com/thackeray-movie-nawazuddin-siddiqui/
ठाकरे सिनेमा 23 जानेवारी 2019 रोजी रिलीज होणार आहे. 18 जुलै रोजी या सिनेमाचा नवा लूक रिलीज झाला होता, ज्यामध्ये अभिनेता नवाझुद्दीन बाळासाहेबांच्या भूमिकेत दिसत आहे. शिवाय सिनेमाचा टीझरही काही महिन्यांपूर्वी लाँच करण्यात आला होता.
via अधिक माहितीसाठी