नवी दिल्ली : क्रिडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठौंड यांनी हे चॅलेंज ‘हम फिट तो इंडीया फिट’ असे हॅशटॅग देत सोशल मिडीयावर दिले होते. त्यानंतर अनेकांनी हे चॅलेंज स्वीकारले. गेल्या काही दिवसांमध्ये फिटनेस चॅलेंज सोशल मिटीयावर व्हायरल होत आहे. अनेक सेलिब्रिटींनी हे चॅलेंज स्वीकारत अनेक फोटोज् आणि व्हिडीओज् सोशल मिडीयावर अपलोड केले.
या फिटनेस चॅलेंज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन, विराट कोहली, ऋतिक रोशन, अनुष्का शर्मा इत्यादी सेलिब्रिटींनी पुर्ण केले. आता दबंग सलमान खाननेही हे चॅलेंज स्वीकारत आपला व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. किरण रिजिजू यांनी हे चॅलेंज सलमान खानला दिलं होतं.
विडिओ पहा:
https://www.instagram.com/p/BmU61nHnQZf/?utm_source=ig_web_copy_link
या व्हिडीओत सलमान सायकलिंग करताना आणि जिम मध्ये व्यायाम करताना दिसत आहे. सलमान सध्या माल्टा येथे ‘भारत’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.