Skip to content Skip to footer

नीट पाहा, तुम्हालाही हे स्थिर चित्र हलताना दिसेल, पण का?

तुम्हाला चित्रात काय दिसतंय? ते स्थिर आहे की त्यात काही हालचाल होतेय? हा एखादा व्हीडिओ किंवा अनिमेटेड GIF तर नाही ना?

वास्तविक हे चित्र optical illusion किंवा दृष्टिभ्रमाचं एक उदाहरण आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी इंटरनेटवर हा फोटो शेअर केला आहे. पण यामागचं विज्ञान काय आहे?

हा फोटो सगळ्यांत आधी न्युरोसायंटिसिस्ट एलिस ब्रोवर्ब यांनी शेअर केला. ते experimental psychologist आहेत, म्हणजे मानवी मेंदू कसा काम करतो, याचा ते अभ्यास करतात.

हे चित्र मल्टिमीडिया आर्टिस्ट बॉ डिले यांनी तयार केलं आहे. त्यात एका बॉल एका स्तंभासकट फिरताना दिसतोय. मात्र हे कोणत्याही प्रकारचं अनिमेशन किंवा GIF नाही, हे आधीच स्पष्ट केलेलं बरं.

नीट पाहा, तुम्हालाही हे स्थिर चित्र हलताना दिसेल, पण का? | optical illusions pictures

 

एलिस यांच्या मते हे चित्र 100 टक्के स्थिर आहे. मात्र त्याला अशा पद्धतीने तयार केलं गेलंय की ते मेंदूला चकवा देतं आणि आपल्याला वाटतं की त्यातल्या वस्तू फिरत आहेत.

मेंदूला असा भ्रम का होतो

आता हा फोटो का हलतोय, हे समजण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींचा परिचय करून घ्यावा लागेल – V4 आणि V5.

या चित्राविषयी सोशल मीडियावर लिहिताना एलिस सांगतात की V5 मुळे आपल्या हालचालीचं ज्ञान मिळतं तर V4 रंगाना आणि आकृत्यांना समजण्यासाठी कामी येतात.

नीट पाहा, तुम्हालाही हे स्थिर चित्र हलताना दिसेल, पण का? | optical illusions pictures

“V4ची क्षमता पूर्ण झाल्यावर V5 आपलं काम सुरू करतं,” असं एलिस सांगतात.

नीट पाहा, तुम्हालाही हे स्थिर चित्र हलताना दिसेल, पण का? | optical illusions pictures

“आपल्याला दिसत असलेल्या गोष्टींबाबत आपल्या मेंदूत एक प्रकारचं द्वंद्व निर्माण होतं. त्यामुळे हा दृष्टिभ्रम होतो. जेव्हा एक प्रकारचे सिग्नल दबून जातात, तेव्हा दुसऱ्या प्रकारचे सिग्नल जास्त प्रमाणात ग्रहण केले जातात,” असं ते पुढे सांगतात.

एलिस यांच्या याविषयीच्या ट्वीटवर बॉ डीले यांनी अशाच प्रकारचे आणखी काही फोटो शेअर केले आहेत.

नीट पाहा, तुम्हालाही हे स्थिर चित्र हलताना दिसेल, पण का? | optical illusions pictures

जर तुम्हाला या फोटोंमध्ये हालचाली दिसत नसतील तर कदाचित तुम्ही ते मोठ्या स्क्रीनवर बघत नसाल.

नीट पाहा, तुम्हालाही हे स्थिर चित्र हलताना दिसेल, पण का? | optical illusions pictures

तुम्ही कदाचित मोबाईल स्क्रीनवर बघत असाल. चांगला इफेक्ट बघायचा असेल तर तिरक्या नजरेने पाहा किंवा कॉम्प्युटरच्या मोठ्या स्क्रीनवर पाहा.

एलिस ब्रोवर्ब यांच्या मते तुम्ही हे फोटो किती अंतरावरून पाहत आहात, यावरही हा इफेक्ट कसा दिसतो, हे अवलंबून आहे.

Leave a comment

0.0/5