Skip to content Skip to footer

मराठा मंदिर चित्रपटगृहात ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चे १,२०० आठवडे पूर्ण

गेल्या २३ वर्षांपासून तरुणाईला ‘मोहब्बत का नाम मोहब्बत है, ये ना कभी बदली है और ना कभी बदलेगी’… अशा डायलॉगने भूरळ पाडणाऱ्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटाने एक आगळा वेगळा विक्रम रचला असून या चित्रपटाचा शो गेल्या २३ वर्षांपासून नियमित मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात सुरू आहे.

तब्बल १,२०० आठवडे मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिरात या चित्रपटाने पूर्ण केले आहेत. अमरीश पुरी, फरीदा जलाल, अनुपम खेर, सतीश शाह आणि हिमानी शिवपुरी या पात्रांना आजही प्रेक्षक विसरु शकलेले नाहीत. पण राज आणि सिमरन म्हणजेच शाहरुख आणि काजोलची जोडी प्रेक्षकांना अधिक भोवली. प्रेक्षकांवर आजही या चित्रपटाची २३ वर्षांपूर्वीची जादू कायम आहे. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्या चोप्रा यांनी केले आहे. चित्रपटाच्या कथेसोबत दमदार पात्र आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यांनीही प्रेक्षकांची मने जिंकली. आजही या चित्रपटातील संवाद आणि डायलॉग प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत.

Leave a comment

0.0/5