Skip to content Skip to footer

काँग्रेसचे सरकार विरोधात उद्या देशव्यापी आंदोलन

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर सीबीआयमध्ये प्रचंड संघर्ष निर्माण झाला असून यासंदर्भात, विरोधक सरकारच्या भूमिकेवर आक्षेप घेत केंद्र सरकारवर हल्ला चढवत आहेत. काँग्रेसने आता याच मुद्यावरून उद्या २६ ऑक्टोबरला रस्त्यावर उतरत संपूर्ण देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी परस्परांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने पावले उचलत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आणि सीबीआयच्या प्रभारी संचालक पदी एम. नागेश्वर राव यांची नियुक्ती केली. विरोधक याच मुद्यावरून केंद्र सरकारवर हल्ला चढवत आहेत.

याच मुद्यावरून केंद्र सरकारवर काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी निशाणा साधला. यात, सीबीआय संचालक आलोक वर्मा राफेल घोटाळाप्रकरणी कागदपत्रे एकत्रित करत होते. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. यावरून पंतप्रधानांचा संदेश स्पष्ट आहे, जो कुणी राफेलवर प्रश्न उपस्थित करेल त्याला हटविले जाईल, असे ट्विट राहुल यांनी केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही सीबीआयमध्ये चाललेल्या वादावरून सरकारवर हल्ला चढवला. राफेल खरेदीत भ्रष्टाचार झाला असून त्याचा निष्पक्ष तपास होऊ नये, यासाठीच केंद्र सरकार पुरेपूर प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Leave a comment

0.0/5