Skip to content Skip to footer

सानिया मिर्झा-शोएब मलिक यांना पुत्ररत्न

हैद्राबाद -टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. आज सकाळी सानियाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. याबाबतची माहिती  शोएब मलिकने ट्विटर अकाउंटवरून दिली आहे. या वृत्तानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावरून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

शोएब मलिकने ट्विट केले कि, ‘हे सांगताना अतिशय आनंद होत आहे कि मुलगा झाला आहे आणि सानियाची प्रकृतीही उत्तम आहे. तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी आभार.’ यासोबतच शोएब मलिकने #babymirzamalik चाही वापर केला आहे.

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा २०१० मध्ये विवाह बंधनात अडकले होते. काही दिवसापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीती सानिया मिर्झाने म्हंटले होते कि, आमच्या मुलाचे नाव मिर्झा मलिक ठेवणार आहे.

Leave a comment

0.0/5