Skip to content Skip to footer

भारतीय चित्रपट, टीव्ही कार्यक्रमावर पाकिस्तानात पुन्हा बंदी

लाहोर उच्च न्यायालयाचा आदेश पाकिस्तानच्या सर्वोच न्यायलयाने शनिवारी रद्दबातल केला असून स्थानीय टीव्ही चॅनल्सला न्यायालयाने भारतीय चित्रपट प्रसारित करण्यावर पुन्हा निर्बंध लावले आहेत.

सर्वोच न्यायालय कराची रजिस्ट्रीमध्ये मुख्य न्यायाधीश साकिब निसार यांनी यूनायटेड प्रोड्यूसर्स असोसिएशनद्वारे स्थानीय टीव्ही चॅनल्सवर विदेशी कार्यक्रम दाखविण्यास बंदी घालण्याचा आदेश दिला. हा आदेश देताना ते म्हणाले, आपल्या संविधानाचे ते उल्लंघन करत असून आपण त्यांच्या चॅनल्सवर निर्बंध लागू करु शकत नाही का?

पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेगुलेटरी अथॉरिटी (पेम्रा)ने यापूर्वी २०१६ मध्ये स्थानीय टीव्ही आणि एफएम रेडिओ चॅनल्सवर भारतीय कार्यक्रमांना पूर्णपणे बंदी घालण्याचा आदेश दिला होता. भारतीय मनोरंजन उद्योगाद्वारे या आदेशाला पाकिस्तानी कार्यक्रम आणि कलाकारांवर बंदी घालण्याच्या आदेशाला प्रत्युत्तर असल्याचे बोलले जात आहे.

Leave a comment

0.0/5