Skip to content Skip to footer

कंबर तोडणाऱ्या रेबेलचा बदला घेणार राखी सावंत

पंचकुला येथील रेसलिंग स्पर्धेत परदेशी रेसलर रेबेल हिला आव्हान देऊन स्वतःची कंबर मोडून घेतलेली बॉलीवूड ड्रामा क्वीन राखी सावंत हिने रेबेलचा बदला घेणार असल्याचे जाहीर केले असून त्यासाठी ती बुलबुल आणि फोगाट भगिनींची मदत घेणार असल्याचे समजते.

पंचकुला येथील रेसलिंग स्पर्धेत अन्य परदेशी महिला रेसलरना हरविल्यानंतर अमेरिकन महिला रेसलर रेबेल हिने भारतीय महिला रेसलरना आव्हान दिले होते. त्यावेळी एकही भारतीय महिला रेसलरने हे आव्हान स्वीकारले नाही तेव्हा रिंग मध्ये राखी सावंत हिने उडी घेऊन रेबेलला चिडविले होते. त्यावर रेबेलने राखीला उचलून आपटल्याने तिच्या कमरेला इजा झाली आणि तिला हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागले. राखी अजूनही हॉस्पिटल मध्येच आहे आणि तिला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला गेला आहे.

मात्र येथेही राखीने रेबेलचा बदला घेणार असल्याचे जाहीर केले आहे. अंबाला येथे होणाऱ्या फाईट मध्ये राखी बरी झाली तर डान्स परफॉर्मन्स देणार असल्याचेही सांगितले जात आहे. राखी रेबेलला तिच्या प्रमाणे डान्स करून दाखव असे आव्हान देणार आहे असे समजते.

Leave a comment

0.0/5