Skip to content Skip to footer

पहा ट्रेलर: ‘राम जन्मभूमी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या विषयावरुन चर्चेत असलेले शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सैय्यद वसीम रिज्वी यांचा ‘राम जन्मभूमी’ असे शीर्षक असलेला चित्रपट निर्माणाधिण असून त्यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

‘राम जन्मभूमी’ हा चित्रपट १९९० साली झालेल्या गोळीबारानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर आधारित आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. ‘राम जन्मभूमी’ चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर येथील एका हॉटेलमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात लॉन्च करण्यात आले. यावेळी बोलताना रिज्वी यांनी कोणत्याही धर्माच्या भावना यात दुखावल्या जाणार नसल्याचे सांगितले. या चित्रपटातून समाजात असलेल्या वाईट प्रवृत्ती मांडण्यात आल्या आहेत. द्वेशाचे वातावरण संपावे अशी या चित्रपटाची मांडणी आहे. या चित्रपटाची कथा वसीम रिज्वी यांनी स्वतः लिहिली असून ते याचे निर्मातेही आहेत. या चित्रपटाचे अधिकांश शूटींग अयोध्यामध्ये पार पडले आहे.

पहा ट्रेलर:

https://youtu.be/LGGVPbrAomo

या चित्रपटाची कथा ३० ऑक्टोबर आणि २ नोव्हेंबरला कारसेवकांवर झालेल्या गोळीबारानंतर तयार झालेल्या परिस्थितीवर आधारित असून सदानंद शास्त्री नावाचे एक व्यक्ती या चित्रपटात आहेत जे निवृत्तीनंतर राम जन्मभूमीवर मंदिर बांधण्यासाठी आग्रही आहेत. चित्रपटाचा व्हिलन मौलाना जफर खान हा पाकिस्तानी एजंट आहे, जो परदेशी निधीवर षडयंत्र रचतो. मशीदीच्या नावावर त्याला मुस्लिमांना भडकवताना दाखवण्यात आले आहे. तो हिंदू आणि मुसलमान यांच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो. शेवटी मुस्लिम त्याचे कारस्थान ओळखतात आणि त्याला देश सोडून जायला भाग पडते.

रिज्वी यांनीही या चित्रपटात एक भूमिका साकारली आहे. राम जन्मभूमीचा मुद्दा न्यायालयात आहे. त्याच्याशी संबंधित एकही मुद्दा या चित्रपटात घेण्यात आलेला नाही. हा चित्रपट सर्व राज्यांनी टॅक्स फ्री करावा अशी विनंती करणार असल्याचे रिज्वी यांनी सांगितले.

रिज्वी यांना अयोध्येत विवादित जागेवर मशिद नसावी असे वाटते. मंदिर पाडून मशिद बांधल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रामाचा जन्म अयोध्येत झाला हे संपूर्ण जग जाणते. ते म्हणाले, समझोत्यासाठी मी अनेकवेळा प्रयत्न केले. पण मी यशस्वी झालो नाही, परंतु नाउमेद झालेलो नाही. कोणत्याही धर्माला दुखवण्याचा रिज्वी यांचा हेतु नाही.

Leave a comment

0.0/5