अभिनेता रितेश देशमुख यांच्या ‘माऊली‘ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर चांगलाच गाजत आहे. ‘माऊली’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री सैयामी खेर मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. सैयामी खैर हिने दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरांचा चित्रपट ‘मिर्ज़ियाँ’ या चित्रपटामधून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘माऊली’ या चित्रपटासाठी ग्रामीण मराठी भाषेची गरज आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ जाधवकडून सैयामी सध्या ग्रामीण मराठी भाषेचे धडे गिरवत आहे.
‘माऊली’ या चित्रपटात रितेश-सैयामी एकत्र दिसणार आहेत. सैयामीने तिच्या या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. सैयामी उत्तमरीत्या मराठी बोलते. परंतु, सैयामीला या चित्रपटासाठी ग्रामीण मराठी शिकणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामीण मराठी भाषेबाबतच्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टी, लहेजा, सिद्धार्थ सैयामीला समजावून सांगत आहे. त्यामुळे, सैयामीने आपल्या भाषेवर घेतलेली ही मेहनत चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये देखील दिसून येत आहे.