२५ नोव्हेंबरचा अयोध्या दौयाचे वादळ शांत होत नाही तोच राजस्थान विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रिंगणात उतरलेले मा. आदित्य ठाकरे राजस्थानच्या भर उन्हात पक्ष प्रचारा करिता पायपीट करीत आहेत. या राजस्थान विधान सभेत शिवसेना पक्षाचे किती उमेदवार निवडून येतील या पेक्षा आदित्य ठाकरेंनी प्रचारात सहभाग घेतल्याने पक्षासाठी अतिशय महत्वाचे व सकारात्मक पाऊल उचलले आहे असे दिसते.
आज इत्तर पक्षाच्या नेत्यांची मुले जिथे आपली lifestyle जगण्यात गुंग आहे तिथे मा. आदित्य ठाकरे सर्वस्वी स्वतःला झोकून पक्ष वाढविण्याच्या कामाला गति देण्याचे काम करीत आहे. याची प्रचिती अयोध्या दौऱ्याला अयोध्येत युवा सेना शाखा उदघाटन करते वेळी दिसली, यामुळे पक्षात काम करणाऱ्या नव्या पिढीला नवी उमंग व तेज आलेले दिसेल. राज्याची निवडणूक स्वबळावर लढविण्याच्या निर्णया नंतर इत्तर गोष्टीला ही उधाण आलेले आहे. त्यात युतीचा सरकारने घेतलेला मराठा आरक्षण संमतीच्या पूर्व संध्येला विधान भवनात आदित्य ठाकरे यांची मा. देवेंद्र फडणवीस यांचा बरोबर आनंद साजरा करताना तसेच आझाद मैदानावर वडील मा.उद्धव ठाकरे यांचा बरोबर लावलेली हजेरी खूप काही बोलून जाते.
पुन्हा तोच मुद्धा उपस्थित होतो की आदित्य ठाकरे यांचा सभेला जरी लाखांची गर्दी झालेली दिसली नाही तरी हजारोच्या संख्येत गर्दी दिसत होती आणि त्यातही तरुण वर्गाचा उस्फुर्त प्रतिसाद दिसत होता. “क्या मांगे राजस्थान तिर कमान तीर कमान” या जयघोषाने आजूबाजूचा परिसर दुंमदुंमला होता. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यानंतर कितपत परिणाम होईल हे चित्र अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु आदित्य ठाकरे यांचा हा दौरा दहा महिने पुढे महाराष्ट्रभर चालू राहिला तर विधानसभेला शंभरी जरूर पार करेल.
आज कोणत्याही पक्षाच्या youth विंग कडे कोणताही प्रोग्राम तयार नसताना आज युवा सेना मार्फत महिला प्रशिक्षण, रोजगार मेळावा, क्रीडा स्पर्धा तसेच राजकीय राजकारणातील वावर यामुळे पक्षाला नक्कीच फायदा होईल.