Skip to content Skip to footer

सुपरस्टार्सचे फोटो पाहून सिनेमा पाहण्याचा काळ गेला; दीपिकाचा टोला

नवी दिल्ली | बड्या सुपरस्टार्सचे फोटो पाहून लोकांनी सिनेमा पहायला येण्याचा काळ आता गेला, लोक सिनेमाची कथा आणि आशय पाहतात, असा टोला दीपिका पादूकोननं लगावला आहे. गेल्यावर्षी महिलाप्रधान सिनेमांनी चांगली कामगिरी केली, असं तिनं म्हटलं आहे.

दीपिका पादूकोननं गेल्यावर्षी सुपरहिट ठरलेल्या 5 सिनेमांची नावं एका कार्यक्रमात घेतली. त्यात शाहरुख खान, आमीर खान, सलमान खान यांच्या एकाही सिनेमाचं नावं नव्हतं.

मागील वर्षी तीनही बड्या सुपरस्टार्सचे चित्रपट चालले नाहीत मात्र आयुष्यमान खुराणाचा ‘अंधाधून’ यशस्वी ठरला, असं दीपिका पादूकोन म्हणाली.

दरम्यान, 2018 मध्ये प्रदर्शित झालेले शाहरुख खानचा झिरो, आमीर खानचा ठग्ज ऑफ हिंदुस्थान आणि सलमान खानचा रेस-3 हे तीनही सिनेमे प्लॉप ठरले होते.

Leave a comment

0.0/5