Skip to content Skip to footer

सोनू सूदने घेतले १० कोटींचे कर्ज ; अनेक मालमत्ता ठेवल्या गहाण

सोनू सूदने घेतले १० कोटींचे कर्ज ; अनेक मालमत्ता ठेवल्या गहाण

लॉकडाऊन लागू झाल्यानंतर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी अभिनेता सोनू सूद सरसावला होता. सोनू सूदने केलेल्या त्या मदतीचे देशभरात कौतुक देखील झाले होते. त्यानंतर त्याच्याकडे एवढा पैसा आला कुठून असेही प्रश्न उपस्थित केले गेले. परंतु सोनू सुदने मदतीचा ओघ सुरूच ठेवला होता.

त्यात आता त्याच्याविषयी आणखी एक माहिती समोर येत असून, त्यामुळे सोनू सूद आणखीनच स्तुतीस पात्र असल्याचे बोलले जात आहे. सोनू सूदने आपल्या ८ मालमत्ता गहाण ठेवून त्याबदल्यात त्याने बँकेकडून १० कोटींचे कर्ज घेतले आहे. त्या पैशांतूनच त्याने लॉक डाउन दरम्यान गरिबांची मदत केली. आपली मालमत्ता गहाण ठेवून त्याने लोकांना सढळ हाताने मदत केली. त्याने त्याच्या नावे असलेल्या जुहू परिसरातील ८ मालमत्ता गहाण ठेवल्या आहेत.

मनी कंट्रोल वेब पोर्टलनुसार, जुहू येथील दोन दुकाने आणि सहा फ्लॅट त्याने गहाण ठेवले व कर्जाची रक्कम मिळवली. ही दोन्ही दुकाने तळमजल्यावर असून शिवसागर को-ऑपरेटीव्ही हाऊसिंग सोसायटीत त्याचे फ्लॅट आहेत. दस्ताऐवजानुसार, त्याने १० कोटींचे कर्ज घेण्यासाठी पाच लाख रुपये नोंदणी शुल्कही भरले आहे. यातील काही मालमत्ता त्याची पत्नी सोनालीच्या नावावरही आहेत. परंतु याबाबत सोनू सूदने अद्याप काहीच खुलासा केलेला नाही.

लोकांना आपल्या गावी जाता यावे यासाठी गाडीभाडे देण्यापासून ते त्यांच्या लग्नापर्यंतचा खर्चही त्याने उचलला होता. हरियाणाच्या मोरनी खेड्यातील मुलांना स्लो-इंटरनेटमुळे समस्या निर्माण होत होत्या. मोबाईल नेटवर्क नसल्याने त्यांना ऑनलाइन अभ्यास करण्यात अडचणी येत होत्या. या गोष्टींची माहिती मिळताच सोनूने त्याचा मित्र करण गिल्होत्राच्या मदतीने त्या गावात एक मोबाईल टॉवर बसविला होता. त्यामुळे स्वतः अडचणी झेलून मदत पुरविण्याचा त्याच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a comment

0.0/5