काठमांडू – परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज (शुक्रवार) भूतानचे परराष्ट्रमंत्री दामचो दोरजी यांच्याशी द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली. सिक्कीममधील डोकलाममध्ये भारत आणि चिनी सैन्य समोरासमोर उभे असल्याबद्दल त्यांच्याशी याबाबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. येथे आयोजित करण्यात आलेल्या बे ऑफ बंगाल फॉर मल्टी सेक्टर टेक्निकल ऍण्ड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन या दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशिया या परराष्ट्रमंत्र्यांच्या परिषदेत दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट झाली. बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान आणि नेपाळ हे या परिषदेचे सदस्य आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज जवळचा मित्र आणि शेजारी असलेल्या भूतानचे परराष्ट्रमंत्री दामचो दोरजी यांची या परिषदेदरम्यान भेट घेतली. या भेटीची छायाचित्रेही त्यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहेत. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेची अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी, भारत, चीन आणि भूतानच्या सीमा जेथे मिळतात त्या ट्राय जन्शनबद्दल ही चर्चा आयोजित करण्यात आली होती. अधिक माहितीसाठी